जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या अंगणवाड्या नव्याने उभारणार

ठाणे/प्रतिनिधी: तुटकी व गळकी छपरे, मोडकळीस आलेली दरवाजे व खिडवन्या, मुलांना बसण्यासाठी असन व्यवस्था नसणे अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील अंगणवाड्यांची झाली आहे. त्यात आता या अंगणवाड्यांना नवी उभारी मिळावी, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ५२ डीपीडीसीतून तर, २१ अदिवासी उपाययोजनातून अशा ७३ नवीन अंगणवाड्या उभारण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बालवस्था या मानवाच्या वाढ व विकासाचा महत्वाचा टप्पा म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने बालकांची शारीरिक, मानसिक आणि जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या अंगणवाड्या नव्याने उभारणार सामाजिक वाढ सहा वर्षे वयोगटापासुन होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंगणवाडी आणि मीनी आंगणवाड्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहेत. त्यात सध्याच्या घडीला जिल्ह्यात १ हजार ८५४ आंगणवाड्या आहेत. त्यापैकी १ हजार ८० आंगणवाड्या ह्या मालकीच्या जागेत भरतात. तर, ७७४ इतक्या आंगणवाड्या ह्या समाज मंदीर, जिल्हा परिषेदेच्या शाळांमध्ये आदी ठिकाणी भरत आहेत. त्यामुळे या आंगणवाड्यांना हक्काची जागा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, अंगणवाड्यांना देखिल जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणे अंगणवाड्या देखिल हायटेक व स्मार्ट करण्याकडे वाटचाल सुरु आहे. दुसरीकडे, मालकीच्या व हक्काच्या जागेतील मोडकळीस आलेल्या अंगणवाड्यांना नवी उभारी मिळाबी, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात यंदाच्यावर्षी ७३ नवीन अंगणवाड्या उभारण्यात येणार आहे. त्यापैकी ५२ अंगणवाड्या या डिपीडीसीच्या निधीतून तर, २१ अंगणवाड्या ह्या अदिवासी उपापयोजनेतंर्गत अंगणवाड्यांच्या उभारणीसाठी ७ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तसेच १५ नवीन अंगणवाड्या मानव विकासमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तर, यामध्ये ५४ अंगणवाड्यांची दुरुस्तीसह ३ शौचालयांची देखिल उभारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील वर्षात सुमारे १०० नवीन अंगणवाड्या उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून ८ कोटींच्या निधीला मंजूर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात जागा उपलब्ध असलेल्या व मोडकळीस आलेल्या शंभर टक्के अंगणवाड्या नवीन उभारण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.


Popular posts