पानी फाऊंडेशनला सर्वोतोपरी मदत

पाणी अडविणे आणि जिरविणे यासाठी ‘पानी | विल्हेवाटीसाठी तंत्रज्ञान फाऊंडेशन' करीत असलेले काम राज्याच्या हिताचे आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन व गावाचा सर्वांगीण विकासही गरजेचा आहे. त्यासाठी सरकारसोबत काम करीत असलेल्या पानी फाऊंडेशनला राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे सांगितले. शेतकरी सर्वार्थाने समृद्ध व्हावा या उद्देशाने सत्यमेव जयते समृद्ध गाव' स्पर्धेच्या माध्यमातून पानी फाऊंडेशन सुरू करीत असलेल्या नवीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी अभिनेते अमीर खान, | श्रीमती किरण राव, सत्यजित भटकळ आदींनी | मुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन | निर्माण उपक्रमाची माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे | | प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे आदी यावेळी उपस्थित होते. यावर्षी हे काम राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये | राबविण्यात येणार असून त्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आमिर  खान यांनी दिली